२०२२ मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक कुठे करावी | Which plan is better for child education in 2022

टी. हार्व एकर (करोडपती मनाचे रहस्य चे लेखक) असे म्हणतात आपण १००० रुंपये उसने घेवून घर खर्च चालवत असाल तर अजून १००० रुपये उसने घ्या व ते योग्य ठिकाणी गुंतवा, बचत करा लवकरच आपण आर्थिक स्वातंत्र मिळवाल| आपल्या आर्थिक नियोजनाचा प्रमुख भाग म्हणजे आपल्या पाल्याचे शिक्षण, मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक कुठे करावी | Which plan is better for child’s educationयाबाबत सखोल विश्लेषण करणे गरजेचे आहे| सध्याच्या काळात आपल्या पाल्यास उत्तम शिक्षण द्यायचे असेल तर आपणाकडे आर्थिक नियोजन करणे, पैश्याचे व्यवस्थित planning करणे गरजेचे आहे|

२० वर्षानंतर जेव्हा आपले पाल्य २० वर्षाचे असेल तेव्हा आजची महागाई अधिक विक्राळ रूप घेईल अशा काळात आपल्याकडे आवश्यक जमापुंजी असणे खूप आवश्यक आहे| छोटे विभक्त कुटुंब, वाढती महागाई व शिक्षणाचा वाढणारा अवास्तव खर्च यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी योग्य वेळेतच गुतंवणूक करणे गरजेचे होते| स्वाभाविक आहे कि लोग मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करणार| आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये आपले पैसे गुंतवणूक करू शकतात|

यावेळी पालकांकडे योग्य व विश्वासू विमा योजनांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत पुरेसी माहिती असणे आवश्यक आहे| तसेच योग्य व विश्वासू आवश्यक महिती नसेल तर आपल्या सोबत फसवणुकीचे प्रकार होवू शकतात अथवा आपले भारी आर्थिक नुकसान होवू शकते| याकरिता आपण या ठिकाणी विस्तृतपणे विश्लेषण करत आहोत कि २०२२ मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक कुठे करावी | Which plan is better for child educationin 2022

Table of Contents

२०२२ मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी | Know things before invest in child’s education in 2022

सर्वसाधारणपणे एक पालक गुंतवणूक करत असताना काही गोष्टींची काळजी घेण जरूरी आहे, ज्यामुळे आपण पालक म्हणून आपल्या आपल्या पाल्याचे भविष्य आर्थिक दृष्ट्या safe सुरक्षित करू शकतो| याकरिता खालील बाबींवर लक्ष्य देण गरजेच आहे|

आपण आपले पैसे tax free करणे गरजेचे आहे.

आपण गुंतवणूक करत असलेले पैसे आपणास tax free करून मिळणे गरजेचे आहे| आपण आपले पैसे tax free योजनांमध्ये लावणे गरजेचे आहे| समजा आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी पैसे बँकेत Fixed Deposit (FD) व Reccoring Deposit (RD) करत असाल तर आपणास त्यावर शासनाने नेमून दिलेला Income Tax बँक आपल्या एकूण परतावा रक्कमेतून वसूल करेल| यामुळे आपलेच नुकसान अधिक होणार आहे| आपण Mutual Funds मध्ये गुंतवणूक करत असाल तर आपणांस १० टक्के ते 20 टक्के पर्यंत tax लागू शकतो|

अशावेळेस शासनाने सुट दिलेल्या विमा व आरोग्य संबधित योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आपण आपले पैसे tax free करू शकतो| Income Tax Act च्या 10,10 D या कलमा नुसार आपण विमा संबधित योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास policy mature झाल्यानंतर मिळणारा संपूर्ण परतावा आपणास TAX FREE मिळू शकतो|  तसेच आपण ITR मधून Income Tax Act च्या ८०C या कलमा नुसार १.५० लाखाचा प्रत्येक वर्षी tax exemption benefit घेवू शकतो| तसेच आरोग्य संबधित विमा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास ITR मधून Income Tax Act च्या ८०D या कलमा नुसार १५००० हजाराचा  प्रत्येक वर्षी tax exemption benefit घेवू शकतो|

 • आपल्या मृत्यू नंतर आपल्या मुलांच्या शिक्षणाचे काय ?
 • आजच्या ताणतणावाच्या व धकाधकीच्या जगात आपले आयुर्मान कमी होताना दिसत आहे| बदलती जीवनशैली, उत्तम आहाराचा व योग्य व्यायामाचा अभाव, junk food, तणावपूर्ण कामाचा तान यामुळे जगभरात १०.३ टक्के तरुण मृत्यूमुखी [पडत असताना भारतातील तरुणांचे मृत्यूचे प्रमाण हे २१ टक्के इतके आहे| तसेच पाश्चिमात्य देशाचे हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यमुळे सरासरी आयुर्मान ६२ वय असताना तेच भारतात फक्त ४७ वय इतके कमी आढळते (Pudhari news)

  यामुळे आपल्या पश्चात पाल्याच्या शिक्षणासाठी व भवित्यव्यासाठी आपण योग्य “मुदत विमा” term insurance अत्यंत जरुरी आहे| योग्य term insurance घेण्यासाठी काही बाबींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे| त्या करिता term insurance येथे आपणास term insurance घेताना कोणती काळजी घ्यावी या बाबत सविस्तर माहिती मिळेल|

  कंपनीची विश्वासार्हता महत्वाची

  आपण आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी व भविष्यासाठी गुंतवणूक करत असतो| यासाठी सदर गुंतवणूक हि long term investment असते| अश्या वेळेस आपण कष्ट करून साठवलेली जमापुंजी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अत्यंत जरुरी व महत्वाचे ठरते| आपला पैसा चुकीच्या हाती जाणे आपल्याला परवडणारे नसणार आहे| यामध्ये आपल्याला भारी आर्थिक नुकसान होणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सदर investment वापरली जाणार आहे| आंधळेपणाने गुंतवणूक करणे टाळावे|

  यासाठी आपण RBI ने मान्यता दिलेल्या बँका व IRDA मान्यता दिलेल्या विमा कंपन्या मध्ये investment गुंतवणूक करणे गरजेचे आहे| त्याचबरोबर कंपनीची मार्केट value व goodwill कसा आहे हे तपासणे देखील महत्वाचे आहे| कंपनी claim settlement ratio कसा आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे|

  आपले उत्पन्न व आर्थिक नियोजन याचा ताळमेळ राखावा|

  आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी व भवितव्यासाठी नियोजन करत असताना आपले येणारे उत्पन्न किती याबाबत एकदा अंदाज घेणे गरजेचे आहे| कारण आपले उत्पन्न कमी असल्यास आपण ज्यादा गुंतवणूक करण्यास बंधणे येतील| समजा आपण उत्पन्नापेक्षा ज्यादा रक्कम गुंतवल्यास आपणावर येणारा आर्थिक ताण व premium भरताना आपली दमछाक होवू शकते|

  आपले उत्पन्न वाढवून आपण अधिक गुंतवणूक करण्यावर भर दिल्यास आपले आर्थिक नियोजन होईलच त्याचबरोबर आपल्या पाल्याचे उत्तम शिक्षणासाठी आपण योग्य तरतूद कराल| उत्पन्नानुसार आर्थिक नियोजनाचा तक्ता येथे आपले आर्थिक नियोजन कसे करावे याबात सविस्तर विश्लेषण केले आहे|

  २०२२ मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक कुठे करावी | Which plan is better for child education in 2022

  या ठिकाणी काही खाली नमूद केलेल्या योजनामध्ये व बाबींमध्ये कमी परतावा परंतु safety ज्यादा आहे तर काहींमध्ये परतावा अधिक परंतु risk ज्यादा आहे तसेच taxable देखील आहेत|

  जीवन विमा अथवा मुदत विमा

  जीवन विमा अथवा मुदत विमा हा गुंतवणुकीचा सर्वात चांगला व safe असा प्रकार आहे यामध्ये प्रत्येक विमा कंपनी आपणास आपल्या गरजेनुसार विमा plan देते ज्यानुसार आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी योग्य नियोजन करू शकतो, तसेच मुदत विमा घेवून आपल्या पाल्याच्या भवितव्याचे योग्य नियोजन करू शकतो|

  मुदत विमा घेताना आपल्या उत्पन्नाच्या २० पट अधिकचा घ्यावा तसेच जीवन विमा घेत असताना आपल्या उत्पन्नाच्या १० पट अधिक घेतल्यास risk factor management उत्तम होवू शकेल| सदर विमा आपण ५, ७ व १० च्या term मध्ये घेवू शकता| यातून आपणास वरती नमूद केल्याप्रमाणे tax free return, वाढीव परतावा व security प्रधान केली जाते|

   उदा. ICICI prudential चे child plans – Signature व Smart Life (Ulip plan) अत्यंत उपयुक्त ठरू शकतात| तसेच ICICI prudential चा Guaranteed Income for Tomarrow हा देखील उत्तम plan असून  यामध्ये आपण गुंतवणूक करून चांगले return मिळवू शकता| ज्यामध्ये आपणास आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी व इतर महत्वपूर्ण घटनांसाठी returns वापरता येतील|

  सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

  आपल्या नावे अथवा आपल्या अज्ञान पाल्याच्या नावे आपण १६ आर्थिक वर्षासाठी पोस्टात अथवा बँकेत गुतंवणूक करू शकतो| वार्षिक किमान ५०० रुपयापासून १.५० लाखापर्यंत आपण ह्या खात्यात गुंतवणूक करू शकतो| सदर गुंतवणूक हि शासनाकडे होत असल्यामुळे अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते| सदर गुंतवणुकीवर आपणास शासनाने दरवर्षी निर्गमित केलेले व्याज अंदाजे ८ टक्के करमुक्त व्याज मिळते| गुंतवणूक हि शासनाच्या करमुक्त धोरणामध्ये येत असल्यामुळे आपणास Income Tax act section 80 C tax benefit मिळतो|

  आपण ७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वर्षातून किमान एकदा अंशत रक्कम काढू शकतो| तसेच policy पूर्ण झाल्यानंतर अधिक ५ वर्षासाठी वाढवून घेवू शकतो| Public Provident Fund उत्तम प्रकार आहे आपल्या पाल्याच्या शैक्षणिक नियोजनासाठी|

  Mutual Fund योजना मध्ये investment करणे

  ह्यामध्ये आपण आपल्या नावे अथवा आपल्या मुलांच्या नावे Systematic Investment Plan (SIP) च्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता| योग्य equity योजनामधून आपणास चागला परतावा मिळू शकतो| आपणास tax benefit घ्यायचा असल्यास आपण ELLS हा plan घेवू शकता यामध्ये आपणास आपणास Income Tax Act section 80 C tax benefit मिळू शकतो|

  आपल्या गरजेच्या आधी २ ते ३ वर्षे आधी सदर रक्कम liquid फंडात गुंतवावी| जेणेकरून आपणास त्याचा अधिक फायदा होईल व बझारच्या अनिश्चिततेचा त्याच्यावर परिणाम होणार नाही| आपण १० वर्षे पेक्षा अधिक काळ सात्यत्याने गुंतवणूक करत राहिल्यास आपणास चक्रवाढ व्याजाने किमान १५ टक्के परतावा मिळू शकतो| ह्यामध्ये गुंतवणूक करताना व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी अन्यथा कमी माहितीमुळे आपणास भारी नुकसान होवू शकते|

  Share Market गुंतवणूक

  Mutual Fund प्रमाणे आपण shares मध्ये देखील आपली गुंतवणूक करू शकता, fund manager यांच्या सहाय्याने आपण योग्य गुंतवणूक करू शकता| सदर गुंतवणूक आपल्या इतर गुंतवणुकीपेक्षा वेगळी ठेवावी, ह्यामध्ये डी-मट account उघडून त्यात सर्व गुंतवणूक करावी| share मार्केट मध्ये आपणास परतावा अधिक मिळू शकतो परंतु यामध्ये जोखीम ज्यादा आहे| कॉफी कॅन पोर्टफोलिओ (CCP) हे एक गुंतवणूक तंत्र आहे ह्यानुसार मागील सर्वात ज्यास्त परतावा देणाऱ्या व नियमितपणे परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो|

  mutual fund व share market मध्ये गुंतवणूक करताना व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी अन्यथा ज्यादा परतावा देणाऱ्या योजना असल्या तरी कमी माहितीमुळे आपणास भारी नुकसान होवू शकते, याची नोंद घ्यावी|

  नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

 • वाढती महागाई पाहता भविष्यात येणाऱ्या शैक्षणिक खर्चाचे मोजमाप आताच कसे करावे ?
 • उत्तर – अगदी बरोबर, आताची महागाई पाहता पुढील 20 वर्षानंतर येणाऱ्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी आपण आपल्या उत्पन्नाच्या १० ते २० पट अधिकचा premium निवडणे आवश्यक आहे| जेणेकरून आपण वाढीव खर्चाचे नियोजन करू शकतो|

 • कोणताही विमा अथवा गुंतवणूक न करता फक्त बचती द्वारे मुलांचे शैक्षणिक नियोजन करणे शक्य आहे का?
 • उत्तर – नाही, असे करणे म्हणजे स्वताच आपला आर्थिक नुकसानीचा खड्डा खणणे याचे कारण असे कि, एक तर महागाई वाढी चा rate १५ टक्के असेल तर तुमच्या उत्पन्न वाढीचा वेग हि त्याच पट्टीत असायला हवा| अन्यथा आपण भविष्यात रोडवर येण्यास वेळ लागणार नाही| तसेच बचत करून तुमची फार फार तर छोटी गरज पूर्ण होईल| परंतु योग्य परतावा न मिळाल्यास आपण आर्थिक नियोजन करू शकत नाही|

 • माझे उत्पन्न खूप कमी आहे, माझ्याकडे शिल्लक खूप कमी असते, आता माझ्याकडे पैसे नाहीत, अश्यावेळेस मी गुंतवणूक कसा करू ?
 • उत्तर – होय आपण गुंतवणूक करू शकता, गुंतवणूक करण्यासाठी आपले उत्पन्न तितके महत्वाचे नाही तर आपला Mindset महत्वाचा आहे, आपला attitude महत्वाचा आहे| Compounding Effect चा नियम सांगतो जर आपण आज १० रुंपये साठवण्यास सुरवात केले असतील तर एक वर्षाने आपणा कडे ३६५० रुपये असणार आहेत| दहा वर्षाने ३६५०० असणार आहेत व हे पैसे चक्रवाढ व्याजाने काही लाखांपेक्षा अधिक होतील|  मुख्य विषय हा असतो कि आपणास financial planning करण्याची सवय लागणे हे महत्वाचे आहे| पैसा कालांतराने आपण अधिक वाढवाल|

  टी. हार्व एकर (करोडपती मनाचे रहस्य चे लेखक) असे म्हणतात आपण १००० रुंपये उसने घेवून घर खर्च चालवत असाल तर अजून एक १००० रुपये घ्या व ते योग्य ठिकाणी गुंतवा, बचत करा लवकरच आपण आर्थिक स्वतंत्र मिळवाल|