जनधन खातेधारकांसाठी खुशखबर : मोदी सरकार अधिक विमा व पेंशन लाभ देण्याचा विचार करत आहे| Pradhanmantri Jandhan Yojana 2021 Benefits | PMJDY

प्रधानमंत्री जनधन योजना या योजने ची घोषणा मा. प्रधानमंत्री नरेंद मोदीजी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी केली होती व या योजनेची सुरवात २८ ऑगस्ट २०१४ पासून करण्यात आली| या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे कि समाजातील गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकास बँकेत, पोस्त ऑफिस, राष्ट्रीयकृत बँकेत zero account वर खाते उघडता येईल| सदर जनधन खात्यासोबत आधार नं लिंक असणार आहे|

ज्यामध्ये ६ महिन्यानंतर ५००० ची overdraft सुविधा होती आता तो १०००० पर्यंत करण्यात आली आहे| रूपे डेबिट कार्ड व रूपे किसान कार्ड सोबत १ लाखाचा दुर्घटना विमा (accidental insurance) देण्यात आला| सुरवातीला १ लाखाचा दुर्घटना विमा (accidental insurance) व ३०००० चा सामान्य विमा देण्यात आला होता| २८.८.२०१८ नंतर उघडलेल्या खात्यांना २ लाखाचा दुर्घटना विमा (accidental insurance) लागू करण्यात आला आहे| Pradhanmantri Jandhan Yojana 2021 (PMJDY) अंतर्गत जनधन खातेधारकांसाठी खुशखबर आहे : मोदी सरकार अधिक विमा व पेंशन लाभ देण्याचा विचार करत आहे|

जनधन खात्याची सध्याची स्थिती

प्रधानमंत्री जनधन योजना अधिकृत पोर्टल च्या ताज्या आकडेवारी नुसार सध्या ४३.९० कोटी लोकांनी आपली जनधन खाती उघडली आहेत| १४७६५५.५३ लाख कोटी पेक्षा ज्यास्त रक्कम ह्या जनधन खात्यामध्ये जमा झाली आहे. ह्या प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे ग्रामीण भागात ६३.६ टक्के खाती काढण्यात आली व ५५.२ टक्के ह्या महिलां खातेधारक आहेत| आता Pradhanmantri Jandhan Yojana 2021 नुसार मिशन ३.० अंतर्गत पुन्हा जनधन खाती काढण्यात येणार आहेत|

Pradhanmantri Jandhan Yojana benefits 2021 | जनधन खात्यास पुढील फायदे मिळतील | प्रधानमंत्री जनधन योजना लाभ

जनधन खात्यातून व्यवहार करत असताना  direct transfer benefit(DBT), Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY), Pradhanmantri Suraksha Bima Yojana (PSBY), Atal Pension Yojana (APY), Micro Unit Development & Refinance Agency Bank(MUDRA) scheme या योजनांचा लाभ आपल्या खात्यावर घेता येईल| मोदी सरकार अधिक विमा व पेंशन लाभ देण्याचा विचार करत आहे|

Pradhanmantri Jandhan Yojana 2021 – मिशन ३.०

Pradhanmantri Jandhan Yojana 2021 -मिशन ३.० अंतर्गत सरकार योजनेचा व्याप वाढवण्याचा विचार करत आहे| यामध्ये शेतकरी, लगू, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांना या योजनेचा लाभ देण्याबाबत विचार करत आहे| शेतकरी, लगू, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांना जनधन खात्या द्वारे आपल्या शेतीचा व उद्योगाचा विकास करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्याबाबत विचार करत आहे|

त्याचबरोबर प्रधानमंत्री जनधन योजना २०२१ – मिशन ३.० अंतर्गत सरकार घर टू घर बँकिंग सुविधा नेण्याचा विचार करत आहे| यामध्ये डीजीटल बँकिंग व प्रत्येक ५ किलोमीटर अंतरामध्ये बँकिंग सुविधा नागरिकांना पुरविण्याचा सरकार विचार करत आहे|

प्रधानमंत्री जनधन खात्यास mobile नं कसा register करावा | जन धन योजना अकाउंट मोबाइल रजिस्ट्रेशन

सर्व प्रथम आपल्या mobile वरून  massage type करावा

 • massage पुढीलप्रमाणे करावा उदा. REG<space>ENTER Jandhan account No.
 • वरील type केलेला massage ०९२२३४८८८८८ ह्या नं पाठवावा, थोड्याच वेळास आपणास confirmation चा massage येईल. सदर massage आल्यास यशस्वीपणे mobile नं add झाला आहे समजावे|

नेहमी विचारले जाणारे प्रश्न –FAQ

 • जनधन खाते कसे काढावे
 • उत्तर : आपल्या जवळ च्या बँकेत आपण संपर्क साधून जनधन खाते उघडण्याबाबत चा अर्ज बँक अधिकारी यांस सर्व कागदपत्रांसोबत सादर करणे, पुढील कार्यवाही बँकेच्या नियमानुसार होईल व कागदपत्रांच्या योग्य पुर्तेतेनंतर आपणास ले जाईल|

 • जनधन खाते उघडण्यास कोणती कागदपत्रे लागतात?
 • |

  उत्तर : जनधन खाते काढण्यास / उघडण्यास पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे|
  अर्जदाराचे आधार कार्ड / ओळख पत्र / ड्राईविंग लाइन्सेंस / पँन कार्ड|
  रहिवासी दाखला – वीज बिल|
  पासपोर्ट साईझ फोटो|
  मोबाईल नं

  जनधन खाते कुणास उघडता येणार नाही?

  उत्तर : १. क्रेंद व राज्य सरकारचे कर्मचारी या खात्याचा लाभ घेवू शकणार नाहीत|
  २. निवृत्त झालेले क्रेंद व राज्य सरकारचे कर्मचारी देखील या खात्याचा लाभ घेवू शकणार नाहीत|
  ३. शासनास कर जमा करणारे नागरिक देखील जनधन खाते उघडू शकणार नाहीत|


  Leave a Comment