Sum Assured व sum Insured यातील फरक | Know meaning of Sum assured and sum insured before invest in insurance

आपण जर insurance policy घेण्याचा विचार करत असाल तर आपणास ह्या दोन बाबी माहित असणे अत्यंत जरुरी आहे| Sum assured व sum Insured यातील फरक | Know meaning of Sum assured and sum insured before invest in insurance| आपली गुंतवणूक आपण कुठे करतोय याबाबत काही term आपल्याला माहित असणे आवश्यक आहे| Sum assured & sum Insured ह्या term विमा क्षेत्रात सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या दोन term आहेत| तसं पाहायला गेलं तर ह्या दोन्हीं मध्ये खूप फरक आहे| तर जाणून घेवूयात दोन्ही मधील फरक कोणता आहे|

Sum assured म्हणजे काय | what is meaning of Sum assured

sum assured हि term आपण जीवन विमा घेताना अथवा maturity benefits शी संबधित विमा घेत असताना पहावयास मिळते| sum assured याचा मराठी अर्थ खात्रीलायक रक्कम, हमीपूर्ण रक्कम, guaranteed असा होतो| समजा आपण विमा घेतल्यास आपणास guaranteed maturity रक्कम मिळते| life insurance घेतानाच आपणास सर्व रक्कम sum assured म्हणून दिली जाते|

पुढे काही ठराविक वर्षांनी policy maturity जरी mature होणार असली तरी त्या वेळ चा व्याज दर न आकारता policy ज्या दिवशी घेतली आहे त्यादिवशी जो व्याजदर आहे त्यानुसार जी रक्कम आपणास ठरवून दिली आहे तीच रक्कम आपणास sum assured म्हणून policy mature होताना दिली जाते| यालाच म्हणतात guaranteed income| उदा. ICICI prudential चा प्रसिद्ध विमा plan आहे guaranteed income for Tomarrow|

sum insured म्हणजे काय | what is meaning of Sum insured

sum insured हि term आपण मोटर विमा, गृह विमा, आरोग्य विमा घेताना अथवा medical benefits शी संबधित विमा घेत असताना पहावयास मिळते| sum insured याचा मराठी अर्थ विमायोग्य रक्कम असा होतो तसेच विमा उतरवणे, ठराविक रक्कमेपर्यंतचा विमा असाही होतो| शक्यतो आपणास भविष्यात येणाऱ्या संभाव्य धोक्यास टाळावयाचे आहे व त्याचा येणारा अंदाजित खर्च या करिता जि रक्कम आपण गुंतवतो त्यास sum insured विमा म्हणतात|

यामध्ये motor insurance, home insurance व  medical insurance यांचा समावेश होतो| सदर क्षेत्राशी संबधित हि term वापरली जाते| जितकी रक्कम संभाव्य धोका म्हणून ठरवून दिली आहे, जितक्या रक्कमेचा विमा घेतला आहे तितक्याच रक्कमेचा sum insured विमा आपणास मिळतो|

उदा.- आपण १ लाखाचा sum insured medical insurance or health insurance घेतला आहे तर आपण आजारी पडल्यास १ लाखापर्यंतचाच विमा आपणास मिळेल| जितकी रक्कमेची जोखीम घेतली आहे, तितक्याच रक्कमेचा sum insured benefit आपणास मिळणार| hospital मध्ये येणाऱ्या एकूण खर्चापैकी फक्त एक लाखाचाच hospital खर्च कंपनी आपणास देईल| अश्यावेळेस ज्यादा खर्च विमा धारकास आल्यास उर्वरित सर्व खर्च विमा धारकास स्वत करावयाचा असतो|

sum insured विमा संभाव्य सीमित रक्कम का प्रधान करतो त्या मागील कारण

sum insured चा मुख्य हेतू हाच आहे कि, विमाधारकाने याकडे आर्थिक लाभ न बघता, फक्त भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानी बाबत sum insured विमा उतरावा हाच उद्देश त्यामागे आहे| उदा. motor damage हा काही आर्थिक फायद्याचा विषय असू शकत नाही|

आर्थीक फायदा करून देणारे इतर जीवन विमा plans आहेत ज्या मध्ये गुंतवणूक करून आपण आपली विमा रक्कम वाढवू शकतो|  

sum insured व sum assured दोन्हीचा समावेश असलेले विमा प्रकार

काही विमा प्रकार असे आहेत ज्यामध्ये दोन्ही चा समावेश होतो| काही कंपन्या सध्या दोन्ही sum insured व sum assured एकाच plan मध्ये देतात| उदा. जीवन विमा सोबत accidental rider, critical illness तसेच health protection rider जे sum insured आहेत या दोन्हीचा समावेश एका plan मध्ये समाविष्ट होतो|