विमा पॉलिसी म्हणजे काय | insurance policy meaning  in marathi | विमा पॉलिसी सविस्तर माहिती याबाबत आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत| विमा पॉलिसी म्हणजे विमा धारक व विमा कंपनी यांच्यातील एक कायदेशीर करार असून ज्यामध्ये विमाधारक त्याच्या जीविताबाबत, भविष्याबाबत, साधनसंपत्तीच्या संभाव्य धोक्यांबाबत व आपल्या कुटुंबाच्या भावितव्याबाबत आर्थिक नियोजन करण्या करिता विमा कंपनी कडे काही रक्कम गुंतवतो, त्या बदल्यात विमा कंपनी विमाधारकास sum assured किव्हा sum insured स्वरूपातआर्थिक सुरक्षा व आर्थिक वाढी ची खात्री देते|

सदर विमा पॉलिसी मध्ये विमा कंपनी विमाधारकास जो लाभ देणार आहे त्याचे सविस्तर विश्लेषण केलेले असते| त्यामुळे कोणताही विमा घेत असताना आपली insurance policy काळजी पूर्वक पाहणे, वाचणे आवश्यक असते| अन्यथा आपली फसवणूक होण्यास वेळ लागणार नाही अथवा आपले खूप भारी नुकसान होवू शकते|

जीवन विमा पॉलिसी चे प्रकार

जीवन विमा हा मुख्य विमा पॉलिसी प्रकार म्हणून ओळखला जातो| यामध्येइतर६ विशेष प्रकार आढळून येतात| विमापॉलिसीघेत असताना खालील विमा प्रकारात आपणास कोणता विमा प्रकार आवश्यक आहे याची खात्री करावी|

 • Term insurance (मुदत विमा)

term insurance मध्ये आपण आपल्या जीविताबाबत ठराविक काळासाठी संरक्षणाची निवड करू शकता| यांमध्ये आपण ठराविक काळासाठी विमा हप्ता भरू शकता ज्यामध्ये आपला मृत्यू झाल्यास सदर विमा रक्कम आपणास मिळते| यामध्ये काही विमा पॉलिसी मध्ये term insurance घेताना संपूर्ण किव्हा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आपणास संभाव्य विमा रक्कम मिळेल असे नमूद असेल तरच आपणास संपूर्ण किव्हा कायमस्वरूपी अपंगत्व मध्ये विमा रक्कम मिळते| अन्यथा आपल्या मृत्यू पश्चात मिळेल|

समजा आपण घेतलेला term insurance कालावधी पूर्ण झाल्यास आपणासकोणतीही रक्कम परत मिळत नाही याची नोंद घ्यावी| term insurance बाबत येथे सविस्तर माहिती मिळेल|

 • Whole life insurance (संपूर्ण जिवन विमा)

जीवन विमा पॉलिसी मध्ये संपूर्ण जिवन विमा हा सर्वात effective व किफायतशीर असा विमा मानला जातो| यामध्ये आपणास आपल्या मृत्यू पश्चात ठराविक रक्कम आपल्या कुटुंबास मिळते अथवा आपणास पॉलिसीmaturity नंतर उत्तमरक्कम परतावा म्हणून मिळते. सदर विमा प्रकार आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्याबाबत सक्षम आहे|

 • Endowment policy

Endowment policy हि एक प्रकारे बचती शी संबधित policy प्रकार आहे यामध्ये विमा धारकाचा विमा मृत्यू झाल्यास संरक्षित रक्कम विमा धारकाच्या कुटुंबास वारसास मिळते व विमाधारकाने policy term व्यवस्थित पूर्ण केल्यास त्यास संपूर्ण maturity रक्कम मिळते|

 • Money back policy or cashback policy

ह्या विमा प्रकारामध्ये आपण गुंतवणूक केलेल्या विमा plan मधून ठराविक टक्के रक्कम आपणास ठराविक कालावधी पर्यंत दिली जाते| policymaturityपूर्ण झाल्यानंतर विमाधारकास उर्वरित रक्कम जीवित लाभ म्हणून दिली जाते| यामध्ये आपण गुंतवणूक केलेल्या संपूर्ण रक्कमेवर विमा संरक्षण मिळते|

 • Children policy

ह्या विमा पॉलिसी मध्ये मुलांच्या भवितव्याचा विचार करून विमाप्रकार दिले जातात| मुलांचे शिक्षण, मुलांच्या भवितव्याचा विचार या plan मध्ये केला जातो| तसेच त्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्यावर विम्यातील काही रक्कम दिली जाते| तसेच पालकांचा आकस्मित मृत्यू झाल्यास विमा कंपनी काही हप्ते माफ करू शकते|

 • Anuity(Pension) plans:

एखांदा कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यासProvident Fund Gratuity एक रक्कमी मिळते| सदर रक्कम एकत्रित मिळाल्यामुळे लगेच संपून जाते| अश्यावेळी आपलीउतारवयात आर्थिक दिवाळे निघण्यास वेळ लागत नाही|तरुणपणात उत्तम आयुष्य जगल्यानंतर उतारवयात आपणास आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो|याकरिता सदर pension plans आपणास उतारवयात आर्थिक स्थिरता आणण्यासमदत करतात|

विमा घेताना विमा पॉलिसी मध्ये वरील नमूद गोष्टी आहेत का हे एकदा पडताळून घेणे गरजेचे आहे| आपण करत असलेली गुंतवणूक योग्य ठिकाणी व अपेक्षित आर्थिक नियोजनबद्ध होणे गरजेचे आहे|

also read : smart life time saver

नेहमी विचारले जाणारे प्रश्न– FAQ

 • आपण विमा का घेतो, विमा घेण गरजेच आहे का, विमा का घ्यावा ?

उत्तर – आपण विमा खालील कारणांकरिता घेतो

 • अकाली मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण.
 • उतारवयातील आर्थिक बोजा सांभाळण्यासाठी.
 • विमाधारकाच्या मृत्यू पश्चात विमाधारकाच्या कुटुंबास आर्थिक संरक्षण देणे.
 • मुलांच्या शिक्षणासाठी विमाधारक विमापॉलिसी घेत असतो.
 • भविष्यात आपल्या उत्पन्नामध्ये  घट झाल्यास insurance policy द्वारे येणारे अतिरिक्त उत्पन आपणास तग धरण्यास मदत करेल.
 • आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी.
 • वरील कारणासाठी शक्यतो विमा घेण्याबात विचार करत असतो| वरील नमूद कारणांपैकी आपण ज्यासाठी विमा घेत आहात ते विमा करारामध्ये आहे का हे तपासून पाहावे| आपणास सांगितलेली सर्व माहित त्यामध्ये नमूद आहे का हे तपासावे|
 • विमा कोण विकत घेवू शकतो ?

उत्तर – घरातील करता पुरुष अथवा महिला या नात्याने ज्या व्यक्तीवर घरातील सर्व जबाबदारी असते ती व्यक्ती आपल्या नावावर विमा घेवू शकतो त्यासविमा धारक असे म्हणतात| विमा घेण्यास अथवा न घेण्याबाबतकोणताही नियम नाही फक्त अज्ञान पाल्यासाठी पालक म्हणून आई अथवा वडील विमापॉलिसी घेवू शकता| खालील व्यक्ती विमा पॉलिसी घेवू शकते|

 • घरातील कर्ता पुरुष अथवा स्त्री
 • गृहिनी
 • जेष्ठ व्यक्ती
 • अज्ञान पाल्य
 • वयाच्या 8वर्षांनंतर कोणीही विमा घेवू शकतो
 • विमा हप्ता (insurance premium) किती असावा, विमा हप्ता कसा निवडावा?

विमा हप्ता ठरवताना आपणास किती आर्थिक संरक्षणाची गरज आहे| याचा विचार केला जातो, तसेच काही घटकांचा सविस्तर विचार केला जातो|

 • आपले वार्षिक उत्पन्न किती आहे
 • आपल्यावर किती कुटुंबातील व्यक्तीची जबाबदारी आहे
 • मुलांच्या शिक्षणासाठी आपणास किती रक्कमेची गरज आहे
 • आपल्या गुंतवणूक जारज किती आहेत
 • आपल्या कुटुंबाची जीवनशैली कशी आहे, सर्वसाधारण कि उच्चभ्रू
 • आपण काही कर्ज घेतले आहे का
 • आपणास किती हप्ता परवडू शकतो याबाबत सविस्तर माहिती असणे

वरील सर्व गोष्टींची पडताळणी आपण करणे गरजेचे आहे जेव्हा आपण विमा हप्ता ठरवत असतो| ढोबळमानाने असे म्हणतात, आपली विमा पॉलिसी ठरवताना आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १० पट ज्यास्त रक्कम संरक्षित विमा म्हणून ठरवली पाहिजे, त्यानुसार आपला विमा हप्ता ठरवता येईल|

also visit SBI life official website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *