२०२२ मध्ये २० ते ४० टक्के जीवन विमा हप्ता (Life Insurance Premium) वाढणार करा असे नियोजन | how to plan if Life Insurance Premium will increase in 2022

२०२२ मध्ये २० ते ४० टक्के जीवन विमा हप्ता (Life Insurance Premium) वाढणार असे सध्याची परिस्थिती पाहता वाटत आहे| येणारा तान कमी करायचा असेल तर आपल्याला योग्य नियोजन करावे लागेल| how to plan if Life Insurance Premium will increase in 2022 याची संपूर्ण व सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत|

Table of Contents

२०२२ मध्ये २० ते ४० टक्के जीवन विमा हप्ता (Life Insurance Premium) का वाढू शकतो | जीवन विमा हप्ता (Life Insurance Premium) २०२२ मध्ये २० ते ४० टक्के वाढण्याचे कारण

कोरोना काळात insurance companies कडे insurance claim येण्याच प्रमाण वाढले| यामुळे विमा कंपनी ना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय| लोकांमध्ये कोरोना काळात विमा खरेदी करण्याबाबत जागरूकता वाढलेली आहे| याचा परिणाम असा होतोय| लोकांचा विमा घेण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे| या वर्षी जुलै २०२१ मध्ये insurance कंपन्यांनी group health insurance मध्ये २५ ते ३० टक्के वाढ केलेली आहे|

भारतातील बड्या Insurance Companies या ६ महिन्यांपासून विमा हप्ता insurance premium वाढवण्याचा विचार करत आहेत| त्याकरिता त्यांनी Insurance Regulatory and Development Authority (IRDA) कडे पाठ्पुरावा करण्यास सुरवात केली आहे| २०२२ मध्ये कदाचित सुरवातीलाच विमा कंपन्या आपला जीवन विमा हप्ता २० ते ४० टक्के वाढ करण्याबाबत निर्णय घेतील|

असंघटीत व मध्यम वर्गाचे मोडणार कंबरडे

अगोदरच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत| पेट्रोल व डीजेल च्या दरांनी शंभरी कधीच ओलांडली आहे| घरगुती गॉस चा दर १००० च्या भावात खेळत आहे| कोरोना ने लोकांची नोकरी हिरावून घेतली आहे| त्यात जीवन विमा हप्ता जर २० ते ४० टक्के वाढल्यास असंघटीत व मध्यम वर्गाचे अक्षरशा कंबरडे मोडणार आहे|

तसेही ह्या वर्गाचा भारताच्या विकासाशी व अर्थव्यवस्थेशी काही दुरान्वये हि संबध जुळत नाही| कारण ह्यांचा विकास दर अद्याप म्हणावा तितका वाढताना दिसत नाही| महागाईचा दर गगनाला भिडला असताना असंघटीत व मध्यमवर्गास मिळणारे मानधन तुटपुंजे आहे| त्यामुळे जीवन विमा हप्त्यांमध्ये होणारी २० ते ४० टक्के वाढ ह्या वर्गास परवडणार नाही|

बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता व आर्थिक स्थिरता आलेल्या वर्गास याचा तितकासा फरक पडणार नाही| याचे कारण असे कि जरी महागाई वाढत असली तरी हा वर्गाने महागाई च्या वेगाने आपले उत्पन्न वाढवण्यावर भर दिला आहे| किंबहुना आर्थिक सुबत्ता व आर्थिक स्थिरता असलेला उच्चभ्रू वर्ग आपणास त्याच्याकडे असलेल्या पूर्वापार साधनांमुळे (उद्योग, जमीन) नेहमी महागाई च्या पुढे कमवताना दिसतो|

जीवन विमा हप्ता जर २० ते ४० टक्के वाढल्यास पुढीलप्रमाणे करावे नियोजन

आपले असणारे उत्पन्न व होणारा अपेक्षित खर्च याचा ताळमेळ राखणे

कोणत्याही खर्चाचे नियोजन करण्यापूर्वी आपले आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे. आपले आर्थिक नियोजन न करता जर आपण खरेदी अथवा गुंतवणूक करत असू तर भविष्यात आपले भारी नुकसान होवू शकते| मानसिक पश्चाताप आपणास सोसावा लागू शकतो| त्याचबरोबर खरेदी अथवा गुंतवणुकीसाठी लागणारा ज्यास्तीचा खर्च जुळवताना आपली दमछाक होवू शकते.

Insurance Regulatory and Development Authority (IRDA) असे सांगते, आपल्या उत्पन्नाच्या ज्यास्तीत ज्यास्त १० पट insurance cover असणारा plan घ्यावा म्हणजे आपल्यावर ज्यादा आर्थिक burden येणार नाही| त्याचबरोबर तज्ञांच्या मते आपल्या एकूण उत्पन्नाच्या ज्यास्तीत ज्यास्त ३० टक्के रक्कम आपण Saving and investment साठी गुंतवल्यास आपल्याला अधिक दमछाक करावी लागणार नाही| पुढे योग्य आर्थिक नियोजन कसे करावे याचा तक्ता दिला आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा व त्यानुसार आपले आर्थिक नियोजन करावे|

योग्य आर्थिक नियोजन कसे करावेयाचा तक्ता

वार्षिक उत्पन्न (अंदाजे) घर खर्च बचत अथवा गुंतवणूकउपभोग
(स्वतासाठी खर्च करणे उदा. वस्तू घेणे, चित्रपट पाहणे, फिरायला जाणे)
१,००,००० (१००%)५०००० (५०%)३०००० (३०%)२०००० (२०%)
येणाऱ्या उत्पनाचे आर्थिक नियोजन कसे करावे हे सांगणारा तक्ता

Premium Policy Term (PPT) बाबत योग्य निर्णय घेणे

काही कंपन्या ५ वर्ष पासून २० वर्षापर्यंत premium policy term (PPT) ठरवत असतात| सरासरी १० वर्षे ते १५ वर्षाचा Premium Policy Term (PPT) असतो| जितकी ज्यास्त PPT असेल तितके आपणास योग्य व accurate आर्थिक नियोजन करावे लागेल| त्याकरिता आपण ५ वर्षे ते ७ वर्ष असलेले PPT plans घेवू शकतो| ज्यामुळे आपल्याला कमी कालावधी मध्ये उत्तम फायदा मिळेल व आपल्याला अधिक आर्थिक नियोजन करण्याची गरज भासणार नाही|

त्याचबरोबर आपण Yearly premium घेण्याऐवजी Half yearly premium घेवू शकतो जेणेकरून आपणास येणारा वार्षिक ताण आपण कमी करू शकतो| खूप मोठी रक्कम असेल तर एका वेळेस रक्कम जमा करत असताना थोडे Stressful होवू शकते| पण तीच रक्कम आपण विभागून जमा केली तर तितका तणाव निर्माण होणार नाही| Half yearly premium शक्य नसल्यासआपण monthly premium नुसार देखील भरू शकतो|

कोणताही विमा अथवा policy घेत असताना होणाऱ्या चुका टाळणे

कोणताही विमा घेत असताना आंधळेपणाने कंपनीच्या advisor वर विश्वास ठेवून policy घेणे, विमा घेणे आपणास त्रासदायक व धोकादायक ठरू शकते| यामध्ये एक आपणास अनावश्यक असणारे rider, आपल्या नियोजनापेक्षा ज्यास्त असलेली रक्कम आपल्या माथी मारली जाऊ शकते| तसेच policy मध्ये include असलेल्या कमी अधिक बाबींची माहिती आपणास पुरेसी नसु शकते|

विमा कंपनीचा goodwill कसा आहे, claim settlement ratio कसा आहे ह्या गोष्टी बघाव्या लागतील| विमा कंपनीचे मार्केट मध्ये नाव कसे आहे ह्या गोष्टी तपासाव्या लागतील| ज्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येवू शकते| कोणताही विमा घेत असताना आपणाकडून ५ चुका होवू शकतात, avoid ५ mistakes when buying insurance टाळायच्या असतील हा blog बघणं गरजेच आहे. त्याचबरोबर आरोग्य विमा घेताना कोणती काळजी घ्यावी याची आपणास संपूर्ण व योग्य माहिती ह्या आरोग्य विमा blog वर मिळेल|

जीवन विमा पॉलिसीचे फायदे | Benefits of a Life Insurance Policy

जीवन विमा पॉलिसी व्यक्तींना विविध फायदे देतात. खालील सर्वात महत्वाचे आहेत:

Risk Cover | जोखीम कव्हर

अनिश्चितता अप्रत्याशित असल्याने आणि एखाद्या व्यक्तीला आणि तिच्या/तिच्या कुटुंबाला केव्हाही समस्या निर्माण करू शकतात, जीवन विमा पॉलिसी घेणे हे सुनिश्चित करेल की तुमचे अनपेक्षित आणि अपघाती मृत्यू झाल्यास तुमचे कुटुंब आणि आश्रितांना दर्जेदार जीवनशैलीचा आनंद मिळतो.

Comprehensive Plan for Different Stages of Life | जीवनाच्या विविध टप्प्यांसाठी सर्वसमावेशक योजना

पॉलिसीधारकाच्या अनपेक्षित आणि अपघाती मृत्यूच्या बाबतीत जीवन विमा केवळ आर्थिक सहाय्यच देत नाही, तर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनही काम करते या अर्थाने की ते तुम्हाला तुमची उद्दिष्टे ठेवण्यास प्रोत्साहित करते, मग ते तुमच्या मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, तुमच्या स्वप्नांचे घर बांधणे किंवा निवृत्तीच्या शांततापूर्ण जीवनासाठी नियोजन करणे. तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि आयुष्याच्या टप्प्यावर आधारित नियोजन केले जाईल. बहुतेक पारंपारिक जीवन विमा योजना, जसे की पारंपारिक एंडॉवमेंट योजना, विशिष्ट मॅच्युरिटी बेनिफिट्स आणि गॅरंटीड मॅच्युरिटी व्हॅल्यूज, गॅरंटीड कॅश व्हॅल्यूज, मनी बॅक इत्यादी अनेक उत्पादन पर्यायांद्वारे अंगभूत हमी देतात.

आरोग्याच्या वाढत्या खर्चासाठी कव्हर | Cover for Increasing Health Expenses

स्टँड-अलोन विमा पॉलिसींद्वारे असो किंवा रायडर्सद्वारे असो, सर्व जीवन विमा प्रदाते हॉस्पिटलायझेशन खर्च आणि गंभीर आजारांसाठी आर्थिक संरक्षण देतात. आरोग्यावरील खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने, आरोग्य विमा पॉलिसींची गरजही वाढली आहे, कारण पॉलिसीधारकाला किमान वैद्यकीय खर्चाचा सामना करावा लागेल.

दीर्घकाळात बचतीला प्रोत्साहन देते | Promotes Savings in the Long Run

जीवन विमा पॉलिसी हे दीर्घकालीन करार असल्याने पॉलिसीधारकाला ठराविक नियतकालिक पेमेंट करणे आवश्यक असते, त्यामुळे पॉलिसीधारकाला बचतीची सवय लावण्यास मदत होते. तुलनेने दीर्घ कालावधीत नियमितपणे पैशांची बचत केल्याने एक चांगला निधी तयार करण्यात मदत होते ज्यामुळे जीवनाच्या विविध टप्प्यांवर तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत होईल.

फायदेशीर आणि सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक | Profitable and Secure Long-Term Investment

विमा उद्योग अत्यंत नियंत्रित आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने अनेक नियम लागू केले आहेत ज्याद्वारे पॉलिसीधारकाचे पैसे भागधारकांकडे सुरक्षित राहतील याची खात्री केली जाते, याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये गुंतवलेल्या सर्व पैशाची जबाबदारी संबंधितांच्या भागधारकांची असेल. ज्या कंपनीद्वारे तुम्ही तुमची पॉलिसी घेता. जीवन विमा हे दीर्घकालीन बचतीचे उत्पादन असल्याने, पॉलिसीधारक अल्पकालीन नफा देऊ शकणार्‍या धोकादायक गुंतवणुकीच्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी दीर्घकालीन परताव्यावर लक्ष केंद्रित करते याची देखील खात्री करते.

उतार वयामध्ये हमी उत्पन्न | Guaranteed Income via Annuities

सेवानिवृत्तीसाठी नियोजन करताना, जीवन विमा पॉलिसींइतकी प्रभावी काही साधने आहेत. तुम्ही ठराविक कालावधीत पैशांची बचत करत असल्याने, तुम्ही व्यावसायिक जीवनातून निवृत्त झाल्यानंतर जीवन विमा पॉलिसी उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत प्रदान करण्यात मदत करतील.

Growth via Dividends | विम्यामध्ये लाभांशाद्वारे वाढ

पारंपारिक जीवन विमा पॉलिसी ग्राहकांना कोणतीही गुंतवणूक जोखीम न घेता आर्थिक वाढीमध्ये भाग घेण्याची संधी देतात. पॉलिसीधारक बोनस/डिव्हिडंडच्या वार्षिक घोषणेद्वारे गुंतवणुकीचे उत्पन्न विभाजित करत असताना, पॉलिसीधारक आर्थिक वाढीस हातभार लावण्याव्यतिरिक्त परिपक्वता लाभ मिळवेल.

Loan Facility | कर्ज सुविधा

जीवन विमा पॉलिसी घेणार्‍या व्यक्तींना त्यांच्या विमा पॉलिसीवर कर्ज घेण्याचा पर्याय असेल, ज्यामुळे त्यांना त्यांनी खरेदी केलेल्या पॉलिसीद्वारे प्रदान केलेल्या फायद्यांमध्ये अडथळा न आणता त्यांच्या अनियोजित जीवनाच्या टप्प्यातील आवश्यकता पूर्ण करण्यात मदत होईल.

Redemption of Mortgage | पॉलिसीचा वापर कर्ज किंवा गहाण परतफेड करण्यासाठी पूर्तता

जीवन विमा पॉलिसी पॉलिसीधारकाने घेतलेले कर्ज आणि गहाण कव्हरेजसाठी सर्वोत्तम संभाव्य साधन म्हणून काम करतात. पॉलिसीधारक त्याच्या/तिच्या कर्जाची किंवा तारणाची परतफेड करण्यास सक्षम नसलेली कोणतीही अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास, शोकग्रस्त कुटुंबातील सदस्यांना परतफेडीचा भार पडणार नाही, आणि पॉलिसीचा वापर कर्ज किंवा गहाण परतफेड करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Tax Benefits | कर लाभ

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आकर्षक कर लाभ देतात आणि तुम्हाला लक्षणीय रक्कम वाचविण्यात मदत करतात जी अन्यथा करांवर खर्च केली जातील.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

  • जरी विमा हप्ता वाढणार आहे पण आमचा Income वाढणार नाही, अश्यावेळी policy Manage करून करून किती करणार?
  • उत्तर : सध्याचा जमाना Digital होत आहे, लोग offline job वरून online job वर शिफ्ट होत आहेत, आपण किती दिवस पारंपारिक काम करणार, आपणास जर आपल्याला योग्य आर्थीक नियोजन करावयाचे असेल तर आपला skillset वाढवावा लागेल, आपल्याला उत्पन्नाचे एकापेक्षा ज्यास्त मार्ग शोधावे लागतील, तरच आपणास अधिक उत्पन्न मिळू शकते| वेळ लागेल पण आपण नक्की यशस्वी होवू शकता| त्याकरिता आजच सुरवात करण गरजेच आहे|

  • विमा हप्ता २० ते ४० टक्के वाढल्यास लोग policy घेणार नाहीत, आपले काय मत आहे?
  • उत्तर : जे लोग वाढीव विमा हप्ता सहन करू शकतात, ज्यांच्याकडे अधिक प्रमाणात पैसा आहे, ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे ते लोग नक्कीच विमा घेतील कारण ते saving and investment वर भर देतात| ज्यांचाकडे पैसा नाही त्यांना थोडे आधिक नियोजन करावे लागेल, उत्पन्नाचे sources वाढवावे लागतील पण विमा सुरक्षा घ्यावी लागेल, तेच योग्य राहील|

    Leave a Comment