30 नोव्हेंबर ला Launch होतोय स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी चा IPO | Everything about Star health insurance IPO launch

या आठवड्याच्या शेवटी दोन मोठे IPO launch होत आहेत, ज्यांची एकूण size हि ७८६८ करोड रुपये आहे| Star Health and Allied Insurance Company च्या IPO ची size ७२४९ करोड रुंपये इतकी आहे| दुसरी कंपनी आहे Tega Industries, ह्या कंपनीच्या IPO ची size ६१९ कोटी इतकी आहे| Star Health and Allied Insurance Company चा IPO ३० नोव्हेंबर २०२१ रोजी बाजारात luanch होत आहे| तर Tega Industries चा IPO १ डिसेंबर २०२१ रोजी बाजारात खुला होतोय|

Star health insurance IPO launching

Star Health and Allied Insurance Company च्या IPO ची बोली २ डिसेंबर पर्यंत लावली जाणार आहे| star health insurance च्या IPO चा price brand हा ८७० ते ९०० रुपये पर्यंत झाला आहे| स्टार हेंल्थ इंश्योरंस च्या IPO ला गुंतवणूकदार लॉट मध्ये बोली लावू शकतात व एका लॉट मध्ये १६ share असतील| कंपनी चे share BSE व NSE दोन्ही वर listing केले आहेत. star health insurance च्या IPO ची listing तारीख संभाव्यपणे १० डिसेंबर रोजी असेल| स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी च्या कामगार व कर्मचारी यांचे करिता १०० कोटी रुपयाचे shares आरक्षित केले आहेत|

Star Health and Allied Insurance Company मध्ये Share Market मध्ये नावाजलेले नाव मा. राकेश झुनझुनवाला व त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे १७.२६ टक्के shares आहेत| यामुळे ह्या IPO वर गुंतवणूकदारांचे चांगले  लक्ष्य आहे|

Star Health and Allied Insurance Company equity shares for IPO

कंपनी द्वारा IPO साठी २००० करोड चा equity share साठी fresh issue व promoter व सध्याचे भागधारक यांच्या द्वारे ५८,३२४,२२५ रुपयाच्या equity share ची विक्री दाखल केली आहे|

Star Health and Allied Insurance Company promoters and promoter groups

 • Safecrop Investments India LLP
 • Konark Group
 • MMPL Trust
 • Apis Growth 6 Limited
 • MIO IV STAR
 • University of Notre dame du lac
 • Miyo Star
 • ROC capital Private Limited
 • Venkatsami Jagannathan
 • Sai Satish
 • Barjis Meenu Desai

वरील नमूद केल्या प्रमाणे star health insurance company चे promoters आहेत|

स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी बाबत थोडक्यात माहिती

स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी हि एक भारतीय कंपनी असून २६ वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ म्हणजे स्थापित करण्यात आली, कंपनीचे मुख्य आफिस हे चेन्नई, तमिळनाडू येथे असून चेन्नई मधून सर्व कारभार चालवला जातो| कंपनी मुख्यत्वे आरोग्य विमा , अपघात विमा  व भारताबाहेरील परदेश प्रवास विमा या क्षेत्रात काम करते| स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी चे चेअरमन व CEO म्हणून वेंकटसामी जगन्नाथन काम पाहतात, व आनंद रोय व डॉ. एस. प्रसाद कंपनीचे MD म्हणून कार्य पाहतात|

३१ मार्च २०२० रोजी अखेर कंपनी ने १८८९ करोड रुपयेची net worth निर्माण केली| स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी मध्ये १२६०० कर्मचारी काम करत आहेत| संपूर्ण भारतभर ६४० एकूण branches ऑफिसेस आहेत|

Why to choose insurance from Star Health and Allied Insurance Company | स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनीचा विमा का घ्यावा

 • प्रत्येक बाबीस अनुसरून आरोग्य, अपघात व प्रवास यामध्ये विमा plan उपलब्ध|
 • संपूर्ण भारतभर ६४० पेक्षा ज्यास्त branches आहेत, ज्यामुळे quick office access उपलब्ध|
 • संपूर्ण भारतात ११००० पेक्षा ज्यास्त hospital सोबत tie up|
 • hospitalise होण्यासाठी गरजेनुसार डॉक्टर visit उपलब्ध|
 • Outlook Money awards 2018 – health insurance provider of the year – winner|
 • best health insurance provider of the year 2018 – Business Today money today financial awards 2018 – 2019|
 • India Leading Insurance Company of the year – Dun & Bradstreet BFSI Summit & awards 2019|

वरील बाबी करिता स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी चा विमा आपण घेवू शकतो| This is reason we can choose Insurance from Star Health and Allied Insurance Company|

२०२२ मध्ये आरोग्य विमा घेत असताना कोणती काळजी घ्यावी यावर सविस्तर blog बनविला आहे| खूप insights आपणास मिळतील|

स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी कडून पुरवले जाणारे plans

 • Senior Citizen: –60 ते 75 वर्षाच्या जेष्ठ नागरिकांकरिता हा plan आहे. यामध्ये १५ लाख ते २५ लाखापर्यंत चा Sum Insured विमा दिला जातो| १ ते ३ वर्ष पर्यंत policy घेता येते व रेनेव करता येते|
 • Family plans : – १८ ते ६५ वयोमर्यादा या plan करिता आहे| इतर benefits देखील आहेत|
 • Family Health Optima Insurance Plan : कंपनी चा सर्वात उत्तम व सर्वात पसंत केलेला plan असून यामध्ये कंपनी विविध फायदे देत आहे, ६८ प्रकारचे खर्च यामध्ये कवर केले आहेत| List of Expenses covered येथे याची संपूर्ण माहिती मिळेल. Family Health Optima Insurance Plan is the best health insurance plan| Family Health Optima Insurance Plan एक best health insurance plan आहे.
 • Medi Classic Insurance Policy : हा plan व्यक्तिगत लोकांकरिता घेता येईल
 • Star Health Gain Insurance Policy : व्यक्तिगत व कुटुंब असा सर्वांसाठी असणारा plan आहे|

नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ

 • स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी claim settlement ratio किती आहे?
 • उत्तर – IBAI’s ५ edition च्या सन २०२० नुसार स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनी चा claim settlement ratio हा ७८.६२ टक्के आहे|

 • Grey Market Premium in IPO म्हणजे काय?
 • कोणताही IPO listing होत असतो तेव्हा त्याची एक initial issue prize ठरवली जाते, गुंतवणूकदार जेव्हा ठरवलेल्या issue prize वर जो premium देण्यास इच्छुक असतात त्यास Grey Market Premium असे म्हणतात.

 • स्टार हेंल्थ अंड एलाइड इंश्योरंस कंपनीचा agent कसे होता येईल?
 • Star Health Insuranceच्या official website जाऊन आपण पार्टनर होवू शकता.


  Leave a Comment