E-shram registration benefits 2 Lakh accidental insurance | E-Shram या सरकारी पोर्टल वर नोंदणी केल्यास मिळेल २ लाखांचा अपघाती विमा

२६ ऑगस्ट २०२१ रोजी भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री, श्रम व रोजगार व राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते ई-श्रम पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले| ई-श्रम पोर्टल चालू करण्याचा हाच उद्देश आहे कि असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डाटाबेस तयार करणे व त्याद्वारे असंघटीत कामगारां करिता योग्य योजना व सुविधांचे नियोजन करणे| ई-श्रम कार्ड हे आपल्या आधार नं सलग्न केले आहे|

२५ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मध्य विभागाचे मुख्य श्रम आयुक्त डी पि एस नेगी यांनी सांगितलेल्या आकडेवारी नुसार भारतामध्ये सध्या अंदाजे ३८ कोटी कामगार हे असंघटीत कामगार आहे| ई-श्रम पोर्टल वर आतापर्यंत ४०० रोजगारांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये हे सर्व असंघटीत कामगार काम करत आहेत| E-shram registration benefits 2 Lakh accidental insurance | E-Shram या सरकारी पोर्टल वर नोंदणी केल्यास , मिळेल २ लाखांचा अपघाती विमा|

ई-श्रम पोर्टल वर कोण नोंदणी करू शकतो

असंघटीत क्षेत्रात काम करणारा कोणताही कामगार ज्याचे वय १६ ते ५९ या दरम्यान आहे| तो ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करू शकतो| यामध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर, बांधकाम मजूर, कामानिम्मित स्थलांतरित होणारे मजूर, फेरीवाले, घरकाम करणारे मजूर, रिक्षाचालक व इतर असंघटीत कामगार यांची नोंद होते तसेच ज्यांची नोंद PPF (people’s Providend Fund) व ESIC (Employee State Insurance Corporation) मध्ये होत नाही| असे सर्व कामगार ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करू शकतात|

आधार कार्ड धरतीवर ई-श्रम कार्ड दिले जाणार असून यामध्ये कामगाराचे संपूर्ण नाव व फोटो, कामगाराचा पत्ता, शैक्षणिक माहिती, रोजगाराची नोंद, विशेष कौशल्य याची माहिती त्याच बरोबर प्रत्येक कामगारास १२ अंकी युनिक कामगार नं Universal Account no. दिला जाणार आहे| या पोर्टल द्वारे नवीन रोजगाराच्या संधी व सुविधा पुरवण्याचा हेतू शासनाचा आहे|

ई-श्रम पोर्टलची सध्याची स्थिती

ई-श्रम पोर्टल वर २५ नोव्हेंबर २०२१ आज अखेर ९ कोटी १७ लाख ३७ हजार लोकांनी यशस्वी नोंदणी केली आहे| यापैकी ६.७७ कोटी म्हणजेच ८०.२४ टक्के लोकांनी केंद्र शासनाच्या CSC (Common Service Service) center मधून नोंदणी केली आहे| उरलेल्या लोकांनी शासनाच्या वेब पोर्टल वरून नोंदणी केलेली आहे| अजून ही लाखो कामगार ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करत आहेत|

२ लाखाच्या अपघात विम्याचा मोफत लाभ

जो कामगार या पोर्टल वर नोंदणी करेल अश्या सर्व कामगाराचा २ लाखाचा अपघात विमा सरकार उतणार आहे| यामध्ये १ वर्षाचा premium केंद्र शासन भरणार असून कदाचित नोंदणीकृत कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा संपूर्ण विकलांगता आल्यास तो कामगार अथवा कर्मचारी २ लाखाच्या अपघाती विम्यास पात्र असेल| कदाचीत सदर कामगारास आंशिक अपघाती विकलांगता आल्यास सदर कर्मचारी १ लाखाच्या अपघाती विम्यास पात्र असेल|

ई-श्रम पोर्टल वर नोंदणी कशी करावी

  • सर्वप्रथम केंद्र शासनाच्या ई-श्रम या अधिकृत पोर्टल वर भेट द्यावी|
  • वर दिलेले पोर्टल open केल्या नंतर homepage वर register on E-shram ह्या लिंक वर click करावे|
  • पुढील window वर Self Registration येथे आधार लिंक्ड मोबाईल नं टाकावा त्यावर OTP येईल. सदर OTP टाकल्यानंतर आपली माहिती भरणारी Window open होईल, त्यावर आपली सविस्तर माहिती भरल्यानंतर आपला १२ अंकी Universal Account no. व आपली संपूर्ण माहिती असलेले कार्ड generate होईल, त्याची प्रिंट काढावी|
  • अश्या पद्धतीने आपण ई-श्रम पोर्टल वर आपली नोंदणी करू शकता तसेच २ लाखाचा अपघाती विमा व इतर शासकीय योजनाचा लाभ घेवू शकता| किंबहुना आपणास यापुढे कोणताही लाभ घ्यावयाचा असेल तर आपणाकडे सदर ई-श्रम कार्ड असणे आवश्यक आहे|

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१. ई-श्रम पोर्टल वर ई-श्रम कार्ड न काढता २ लाखाचा मोफत विमा मिळेल का?

उत्तर: नाही, हि सुविधा त्यांच्या साठी आहे जे ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करतील व आपले ई-श्रम कार्ड काढतील, त्यांनाच शासन २ लाखांचा अपघाती विमा देणार आहे| ई-श्रम कार्ड mobile वर काढता येईल का?

२. ई-श्रम कार्ड mobile वर काढता येईल का?

उत्तर: हो आपण स्मार्टफोन वर वरील प्रमाणे registration करू शकता|

३. अपघाती विम्याचा लाभ किती वर्षे असणार आहे?

उत्तर: शासन एक वर्ष त्याचा premium भरणार आहे त्यामुळे आपणास एक वर्ष सदर विमा मोफत मिळेल, आपणास पुढेही त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास पुढील premium भरावे लागतील|

४. PPF (people’s Providend Fund) व ESIC (Employee State Insurance Corporation) कामगार ई-श्रम वर नोंदणी करू शकतात का?

उत्तर: नाही, फक्त असंघटीत कामगार व मजूरांसाठी हि योजना आहे|

अगर आप मांगोगे पर मेहनत नही करोंगे

तो कभीभी आप कामयाब नही बनोंगे,

कामयाबी मांगनेसे नही मिलती,

निरंतर मेहनत करनेसे मिलती है

Pawan Agralwal, Blogger and Youtuber

Leave a Comment