२०२२ मध्ये आरोग्य विमा [AAROGYA VIMA] घेताना कोणती काळजी घ्यावी | how to take right health insurance in 2022 | Aarogya Vima Marathi

भारताच्या २०१६ च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षना नुसार फक्त 20 टक्के भारतीयांकडे आरोग्य विमा आहे| सर्वसामान्य नागरिकांचे असे मत आहे कि आपला आरोग्यावर येणारा सर्व हॉस्पिटल खर्च आपण आपल्या नियमित कमाईवर भागवू शकतो| यातून आपण आपल्याकडे रोख पुंजी ठेवण्याकडे कल देतो जेणेकरून येणाऱ्या आरोग्या वरील खर्चासाठी वापरता येईल| पण प्रत्यक्षात येणाऱ्या खर्चाचे प्रमाण ज्यास्त असू शकते| अश्या वेळी आपण ती जोखीम न घेता योग्य आरोग्य विमा घेवून आपली जमापुंजी योग्य ठिकाणी गुंतवू शकतो| २०२२ मध्ये आरोग्य विमा घेताना कोणती काळजी घ्यावी, How to take right health insurance in 2022 या करिता आपणास खालील बाबी समजून घेण जरुरी आहे|

सध्याची आरोग्याबाबतची स्थिती

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या “१४ वा राष्ट्रीय आरोग्य स्थिती अहवाल” नुसार असंसर्गजन्य रोगांमध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल झालेल्या ६.५१ कोटी रुग्णांपैकी ४.७५ टक्के रुगांना मधुमेह (Diebities), ६.१९ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब (High Blood pressure), ०.३० टक्के हृदया संबधित आजार, ०.१० टक्के रुग्णांना स्ट्रोक व ०.२६ टक्के रुग्णांना कर्करोग (Cancer) झाल्याचे निदान झालेले आहे| अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय या अधिकृत पोर्टल वर भेट देवून अधिक माहिती घेवु शकता|

कोरोना येण्यापूर्वी लोग आजारी पडत न्हवते किंव्हा आरोग्याच्या दुष्टीने काही तक्रारी नव्हत्या| पण असे नाही पूर्वीही लोक आजारी पडत होते| एक तर आपल्याकडे शारीरिक समस्या असतील तर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य केले जाते| अश्या वेळी लोकांच्या मानसिक आरोग्यावर कोणतीही चर्चा होणे ही काही सहज घडणारी व स्वाभाविक गोष्ट नाही| जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २०१९ च्या report नुसार भारतामध्ये २० कोटी नागरिकांना प्रत्यक्ष्य मानसिक आरोग्याबाबत च्या treatment किंव्हा योग्य सल्ल्याची गरज आहे|

आरोग्य व कोरोना पश्चात सद्यस्थिती

हा काळ जर कोरोना पूर्वीचा म्हणजे २०१९ पूर्वीचा असता तर आपण आज असे म्हणालो असतो कि आज हि आरोग्य विमा घेण्याची तितकी शी गरज वाटत नाही| किंबहुना लोकांनी आपल्या स्वताच्या व कुटुंबाच्या safety साठी आरोग्य विमा घेतला पाहिजे ह्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता|

पण कोरोना ने सर्व जगाला विचार करायला भाग पडले आहे| कोरोना मुळे निर्माण झालेली अभूतपूर्व आरोग्याची गंभीर परिस्थिती, ज्यांना कोरोना झाला त्यांना कोरोनाने व आपल्याकडील आरोग्य यंत्रणेने अगदी गुडघे टेकायला लागतील इतके आर्थिक ओझे दिले| त्यातून कित्येकांची साठवलेली आर्थिक पुंजी संपली| तर काहीजण अक्षरशा आर्थिक कंगाल होवून रोड वर आले|

२०१९-२० मध्ये निर्माण झालेल्या health crisis मध्ये आता लोकांचा कल आरोग्य विमा संबधित गोष्टीमध्ये आला आहे| मी तर असे म्हणेन, २०२० नंतर कोणी म्हणंत असेल कि आरोग्य विमा घेणं तितके गरजेच वाटत नाही असे म्हंटल्यास अतिशयोक्ती होईल| कोरोनाने लोकांना कमी कालावधी मध्ये स्वताकडे व आरोग्य व आयुर्विमा याकडे लक्ष्य वेधण्यास भाग पडले| त्याचबरोबर कोणताही विमा मग तो आयुर्विमा, आरोग्य विमा किव्हा टर्म विमा घेत असताना ज्या चुका टाळल्या पाहिजे या करिता policy mistakes when buying insurance हि लिंक आपणास उपयुक्त ठरेल|

२०२२ मध्ये आरोग्य विमा ( AAROGY VIMA ) घेताना कोणती काळजी घ्यावी

सध्या आरोग्य विमा घेण्याकडे वाढलेला लोकांचा कल पाहता, त्याठिकाणी लोकांची फसवणूक देखील होण्याची शक्यता आहे| आपण आरोग्य विमा घेत आहात व आपणास विमा policy संबधित अधिक माहिती नसेल तर आपले भारी नुकसान होवू शकते| याकरिता आपणास काही गोष्टीकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे| खालील नमूद केलेल्या बाबी आरोग्य विमा [AAROGY VIMA] करत असताना ध्यानात घेतल्यास आपला पैसा, वेळ, नुकसान व होणारा पश्चाताप टाळता येईल|

१. आपली आर्थिक मर्यादा किती व संभाव्य आरोग्याचा खर्च याबाबत ताळमेळ ठेवणे.

आरोग्य विमा घेत असताना आपले वार्षिक उत्पन्न किती याबाबत थोडे नियोजन करणे गरजेचे आहे| आपल्याला आपले आर्थिक नियोजन करावे लागेल. तज्ञांच्या मते ढोबळमानाने खालील तक्ता सांगतो कि आपले येणारे उत्पन्न कश्या पद्धतीने खर्च करावयास हवे| आपल्याला आरोग्य विमा अथवा इतर ठिकाणी गुंतवणूक करावयाची असेल तर आपल्या उत्पन्नाच्या ३० % रक्कम गुंतवू शकतो|

अ. येणाऱ्या उत्पनाचे आर्थिक नियोजन सांगणारा तक्ता

वार्षिक उत्पन्न (अंदाजे) घर खर्च बचत अथवा गुंतवणूकउपभोग
(स्वतासाठी खर्च करणे उदा. वस्तू घेणे, चित्रपट पाहणे, फिरायला जाणे)
१,००,००० (१००%)५०००० (५०%)३०००० (३०%)२०००० (२०%)
येणाऱ्या उत्पनाचे आर्थिक नियोजन कसे करावे हे सांगणारा तक्ता

आपली असणारी गुंतवणूक किती त्याचबरोबर आपण आपल्या उत्पनापैकी किती रक्कमेचा claim घेवू शकतो याकडे आपण लक्ष्य देणे गरजेचे आहे| अन्यथा आपणास अधिक रक्कमेचा claim घेतल्यास संभाव्य हप्ते भरत असताना आपली दमछाक होण्याची शक्यता असते|

२. claim Settlement Ratio

आपण आरोग्य विमा [AAROGY VIMA ] घेत असताना काही गोष्टींकडे अजिबात लक्ष्य देत नाही यामध्ये कंपनीचा claim settlement ratio किती आहे| हे आपण पहात नाही अन यामुळेच आपले भारी नुकसान होवू शकते किंबहुना कंपनी आपला health insurance claim reject करू शकते|

या ठिकाणी IBAI’s General Insurance Claim Insights Handbook – 5th Edition नुसार भारतातील insurance settlement claim देणाऱ्या सर्व insurance कंपनीची आकडेवारी व rank खाली नमूद केली आहे| खाली नमूद आकडेवारी नुसार आपणास लक्ष्यात येईल कि कोणत्या कंपनीची सर्वात ज्यास्त rank आहे|

RankInsurance Companyhealth claim settlement ratio FY 20
IFFCO tokia General Insurance96.33 %
Care Health Insurance95.47 %
Magma HDI Health Insurance95.17 %
The oriental Insurance Company93.96 %
The New Insurance General Insurance 92.68 %
Bajaj Allianz General Insurance92.24 %
Max Bupa Health Insurance89.46 %
Navi General Insurance 86.98 %
HDFC Ergo General Insurance86.52 %
१०Manipal Signa Health Insurance 85.72 %
११Edelwiese General Insurance85.57 %
१२National Insurance Company 83.78 %
१३Future Generali General Insurance82.96 %
१४Royal Sundaram General Insurance 81.50 %
१५Liberty General Insurance 81.03 %
१६ICICI Lombard General Insurance78.67 %
१७Star Health Insurance78.62 %
१८United India Insurance Company78.03 %
१९Reliance General Insurance76.43 %
२०Tata AIG General Insurance76.04 %
२१Bharti AXA general Insurance76.01 %
२२Kotak mahindra General Insurance 75.45 %
२३Acko General Insurance 74.09 %
२४Aditya Birla Health Insurance70.81 %
२५Universal Sompo General Insurance 70.75 %
२६SBI General Insurance66.08 %
२७Go Diggit General Insurance 63.56 %
२८Cholamandalam MS General Insurance 56.25 %
Information Source : IBAI’s General Insurance Claim Insights Handbook – 5th Edition

३. कॅशलेस सुविधा असलेल्या हॉस्पिटलची सख्या

ज्या कंपनी कडे आपला आरोग्य विमा [AAROGY VIMA] घेणार आहे अश्या कंपनीची भारतामध्ये किती hospital सोबत tie up आहे, हि माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे आहे, अन्यथा आपण insurance घेतलेल्या कंपनीसोबत असलेले हॉस्पिटल आपण ज्या भागात राहतो त्या भागात आहे का हे पाहावे लागेल|

IBAI’s General Insurance Claim Insights Handbook – 5th Edition नुसार भारतातील insurance settlement claim देणाऱ्या सर्व insurance कंपनीचे भारतातील किती hospital सोबत tie up आहे याची आकडेवारी या ठिकाणी नमूद केलेली आहे| सदर माहितीचा उपयोग आपणास योग्य insurance कंपनी निवडत असताना होईल.

RankInsurance CompanyNetwork Hospitals tie up in India
1IFFCO tokia General Insurance5000+
2Care Health Insurance7400+
3Magma HDI Health Insurance4300+
4The oriental Insurance Company 4300+
5The New Insurance General Insurance1500+
6Bajaj Allianz General Insurance 6500+
7Max Bupa Health Insurance 4500+
8Navi General Insurance5100+
9HDFC Ergo General Insurance 10000+
10Manipal Signa Health Insurance6500+
11Edelwiese General Insurance 2500+
12National Insurance Company6000+
13Future Generali General Insurance 5100+
14Royal Sundaram General Insurance5000+
15 Liberty General Insurance 5000+
16 ICICI Lombard General Insurance 5000+
17Star Health Insurance9900+
18United India Insurance Company 7000+
19Reliance General Insurance7300+
20Tata AIG General Insurance 3000+
21Bharti AXA general Insurance4500+
22Kotak mahindra General Insurance 4000+
23Acko General Insurance5000+
24Aditya Birla Health Insurance 6000+
25Universal Sompo General Insurance4000+
26 SBI General Insurance 6000+
27Go Diggit General Insurance5900+
28Cholamandalam MS General Insurance8000+
Information Source : IBAI’s General Insurance Claim Insights Handbook – 5th Edition

४. Health insurance policy ची सविस्तर माहिती घेणे.

जेव्हा health insurance policy घेत असताना, काहीवेळेस आपण advisor ने दिलेल्या अपुरया माहितीद्वारे आपली insurance policy घेत असतो| किव्हा आपण ज्यादा माहिती न घेता आपणास जितकी माहिती सांगितली जाते तेवढ्या माहितीवर अवलंबून राहत आपण पोलीसी मधील इतर माहिती घेत नाही| खालील नमूद केलेली माहिती आपण आपल्या policy मध्ये आहे का याची खात्री करून घ्यावी|

  • इतर कोणकोणते रीडर policy मध्ये घेतले आहेत. उदा. accidental rider, critical illness ज्यामुळे आपणास अधिक policy benefits मिळू शकतात, पण त्याकरिता आपणास ज्यादा premium द्यावा लागेल. काहीवेळेस आपणास नको असलेले rider आपल्या policy मध्ये add on आहेत का हे देखील तपासणे गरजेचे आहे|
  • आरोग्य विमा {AAROGY VIMA] घेण्यापूर्वी अस्तित्वात असलेले आजार (Pre existing illness) यांचा समावेश waiting period मध्ये आहे का? हे देखील तपासावे लागेल. काही insurance companies कडून ६ महिने ते १ वर्षाचा waiting period हा Pre existing illness साठी दिला जातो|
  • policy premium मध्ये वाढ करता येणे. आपण policy मध्ये सुविधा असेल तर आपला premium वाढवू शकतो जेणेकरून आपणास त्याचा ज्यादा फायदा मिळू शकतो|
  • policy renovation. आपणास policy मध्ये अजून काही riders अथवा सुविधा घ्यायच्या असतील तर भविष्य मध्ये तशी policy renovation ची सुविधा आहे का हे हि तपासून पाहावे लागेल|

आरोग्य विमा [AAROGY VIMA] घेत असताना कोणती काळजी घ्यावी?

हो, संपूर्ण ब्लोग ह्या करिता बनवला आहे कि आरोग्य विमा [AAROGY VIMA] घेत असताना कोणती काळजी घ्यावी, ती पुढील प्रमाणे
१. आपले उत्पन्न किती आहे हे तपासले पाहिजे, आपल्या आर्थीक मर्यादा बघून policy premium ठरवला पाहिजे|
२. कंपनी चा claim settlement ratio किती आहे हे तपासून घ्यावे लागेल. भारतातील सर्व कंपनीचा claim settlement ratio वरती दिला आहे|
३. hospital tie up with insurance company हे देखील तपासून घ्यावे लागेल, आपल्या भागातील किती hospital tie up आहेत हे पाहावे लागेल| किती हॉस्पिटल्स विमा कंपनी सोबत जोडली आहेत ह्याची वरती दिली आहे|
४. आपल्या आरोग्य विम्याची सविस्तर घेणे अत्यंत गरजेचे आहे|

सध्या २०२२ मध्ये आरोग्य विमा घेणं खरचं जरुरी आहे का?

हो, आजच्या ह्या धकाधकीच्या काळामध्ये आरोग्य विमा घेणं अत्यंत जरुरी व आर्थिक नियोजनाचा एक महत्वपूर्ण भाग बनल आहे|

Leave a Comment