Debit Card वर मिळवा १० लाखांचा free accidental insurance | समजून घ्या संपूर्ण माहिती व लाभ

आज बँकेत account नाही असा व्यक्ती सापडणे मुश्कीलच| आज प्रत्येक व्यक्तीकडे किमान एक डेबिट कार्ड असणार यात शंकाच नाही| पण आपणास मी असे सांगितले कि, जर तुमच्या कडे डेबिट कार्ड असल्यास आपण Debit card वर मिळवा १० लाखांचा free accidental insurance तो हि अगदी मोफत| हो हे अगदी खरे आहे कि डेबिट कार्ड वर १० लाखाचा अपघात विमा मोफत आहे|

सदर accidental insurance कवर मास्टरकार्ड, रूपे कार्ड व विसा कार्ड कडून मिळणार आहे| काही वेळास कंपन्या बँकेसोबत tie up करत सदर अपघाती विमा देतात| आपणास अपघाती विमा तेव्हांच मिळतो जेव्हा कार्ड होल्डर चा अपघाती मृत्यू होतो किंव्हा अपघातामुळे कार्ड होल्डर ला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास सदर च्या विम्याचा लाभ मिळतो|

Debit Card वर free accidental insurance benefits | डेबिट कार्ड वर १० लाखांचा अपघाती विमा संपूर्ण माहिती व लाभ

डेबिट कार्ड चे विविध प्रकार आहेत| त्यामुळे आपणास १० लाखाचा अपघाती विमा मिळेल कि पेक्ष्या कमी किमंतीचा विमा मिळेल हे सर्वस्वी आपल्या जवळ असलेल्या डेबिट कार्डवर अवलंबून आहे| SBI च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या माहिती नुसार SBI Gold कार्ड करिता २ लाखांचा अपघाती विमा आहे| Platinum Card साठी ५ लाखांचा अपघाती विमा आहे| Pride Card साठी २ लाखांचा अपघाती विमा, premium Card साठी ५ लाखांचा विमा व Signature and Mastercard साठी १० लाखांचा अपघाती विमा लागू होतो|

वरील माहिती हि बिगरहवाई प्रवासासाठी लागू आहे| कार्ड होल्डरचा हवाई अपघाती मृत्यू झाल्यास सदर व्यक्तीस त्याच्या डेबिट कार्डवर लागू विम्याच्या डब्बल रक्कम अपघाती विमा म्हणून दिली जाते| त्याकरिता हवाई प्रवासाच्या तिकिटावर डेबिट कार्डने खर्च केल्याचा उल्लेख असला पाहिजे|

त्याचबरोबर कार्ड होल्डर ला Purchase Protection benefit मिळू शकतो| कार्ड होल्डर ला purchase benefits चा लाभ तेव्हांच मिळू शकतो जेंव्हा मागील ९० दिवसांमध्ये सदर डेबिट कार्डवर खरेदी केली असून आपल्या गाडी मधून किव्हा आपल्या घरातून  खरेदी केलेली वस्तूची अथवा मालाची चोरी झालेली आहे|

SBI Gold कार्ड करिता ५००० Purchase Protection benefit आहे| Platinum Card साठी ५०००० Purchase Protection benefit आहे| Pride Card साठी ५००० Purchase Protection benefit आहे, premium Card साठी ५०००० Purchase Protection benefit व Signature and Mastercard साठी १ लाखाचा Purchase Protection benefit आहे|

Debit Card वर free accidental insurance benefit rules | डेबिट कार्ड वर १० लाखांचा अपघाती विमा अटी व शर्ती

हा लाभ मिळवण्याकरिता ज्यादा किचकट अटी व शर्ती नाहीत| फक्त आपण अपघात होण्यापूर्वी ९० दिवसाच्या आत सदर डेबिट कार्ड वापरलेले असावे असा नियम आहे| ९० दिवसाच्या आत सदर डेबिट कार्ड वापरलेले नसल्यास आपणास वरील नमूद कोणताही फायदा मिळणार नाही याची नोंद घ्यावी|

नेहमी विचारलेले प्रश्न – FAQ

  • डेबिट कार्ड विमा याबाबत सविस्तर माहिती कुठे मिळेल?
  • उत्तर – आपणास सर्व माहिती नजीक च्या शाखेत किव्हा आपले डेबिट कार्ड ज्या बँकेत आहे त्या बँके मध्ये चौकशी केल्यास आपणास सर्व मिळून जाईल|


    It’s hard to beat a person who never gives up.”

    – Babe Ruth

    Leave a Comment